1 POSTS
परशुराम कोकणे 2006 सालापासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सोलापूर दैनंदिन, बंधुप्रेम, जागृत जनप्रवास, सुराज्य, तरुण भारत, संचार आदी दैनिकांमध्ये बातमीदार, उपसंपादक म्हणून काम केले आहे. ते ‘सकाळ’च्या सोलापूर आवृत्तीमध्ये क्राईम रिपोर्टर आहेत. पर्यावरण हाही त्यांचा आवडीचा विषय आहे. पदभ्रमंती आणि ट्रेकिंग यांचेही त्यांना वेड आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर केले आहे. ‘स्वप्नपूर्ती फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी स्वत: कळसुबाई शिखर, किल्ले लोहगड अशा मोहिमांचे आयोजन केले होते. ते शिवराष्ट्र हायकर्स आणि हिंदवी परिवार यांच्या मोहिमांमध्येही सहभागी होतात. त्यांनी ‘इको फ्रेंडली क्लमब’ची स्थापना करून पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतले आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
8888856530