निवेदिता खांडेकर या दिल्लीत मुक्त पत्रकार म्हणून काम करतात. पर्यावरण आणि विकास हे त्यांचे आवडते विषय. त्यांबाबतचे लेखन त्या अधिक करतात. त्या ईशान्य भारतात, खास करून आसाम आणि अरुणाचल प्रदेश या ठिकाणी वार्तांकनासाठी वारंवार जात असतात.
मीराबायदेव नावाच्या मूळ मराठी महिला कार्यकर्त्या आसाममधील चहाच्या मळ्यांच्या प्रदेशात लोकप्रिय आहेत. त्या तेथील कामगारांच्या कुटुंबीयांचे जीवनमान सुधारावे, त्यांना चांगल्या सवयी लागाव्या, त्यांचे शिक्षणाने भले व्हावे यासाठी कळकळीने प्रचार करत असतात.