1 POSTS
प्रा.निशिकांत ठकार मूळ सोलापूर जिल्ह्यातील (जन्म 11 जून 1935, पंढरपूर), पण ते अखेरीस स्थिरावले पुण्यात. त्यांची सर्व कारकीर्द (एम ए- हिंदी व मराठी) शाळा कॉलेजांत शिकवण्यात गेली. त्यांनी सोलापूरच्याच ह.दे. प्रशाला व वालचंद महाविद्यालय येथे मुख्यत: शिकवले. ते हिंदी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यांनी हिंदी व इंग्रजी भाषांतून मराठी व उलट असे महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद लेखन- संपादन भरपूर केले आहे. त्याकरता त्यांना साहित्य अकादमी आणि इतरही पुरस्कार मिळाले आहेत.