1 POSTS
अविनाश कोल्हे हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून एप्रिल 2017 मध्ये मुंबईच्या डी.जी. रूपारेल महाविद्यालयातून निवृत्त झाले. सध्या ते ‘चीनमधील मुस्लिम समाजातील अलगतेची भावना’ या विषयावर पीएच डी पदवीसाठी संशोधन करत आहेत. त्यांनी ‘साप्ताहिक माणूस’च्या काही काळ संपादनासह अनेक दिवाळी अंकांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. त्यांनी ‘डॉ. मनमोहनसिंग यांचे चरित्र’ आणि ‘भारताची फाळणी’ ही दोन पुस्तके भाषांतरित केली असून, गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्रही लिहिले आहे. 2016 मध्ये त्यांचा ‘रंगदेवतेचे आंग्लरूप : मुंबईतील अमराठी रंगभूमी’ हा इंग्रजी व हिंदी नाटकांच्या परीक्षणांचा संग्रह आणि 2017 मध्ये ‘सेकंड इनिंग’ हा दोन दीर्घकथांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांची ‘चौकट वाटोळी’ ही पहिलीच कादंबरी आहे.
लेखकाचा दूरध्वनी
989 210 3880