1 POSTS
नरेशकुमार बोरीकर हे शिक्षक आहेत. त्यांना चंद्रपूर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. ते कवी-लेखक आहेत. ते चंद्रपूरच्या फिनिक्स साहित्य मंचाचे अध्यक्ष आहेत. ते वर्धा येथील मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी होते. ते रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. ते शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक कार्यक्रमांत सूत्रसंचालन करतात.
‘पालडोह’ हे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील घाटवळणावरचे गाव… ते गाव शेतीचे वाद, कौटुंबिक भांडणतंटे, भुरट्या चोऱ्या, अंधश्रद्धा, बालविवाह अशा कारणांनी तालुक्यात बदप्रसिद्ध होते. राजेंद्र परतेकी यांनी गावच्या या शिक्षणविषयक उदासीनतेवर मात करण्याचे ठरवले. राजेंद्र यांनी विद्यार्थी, पालक, गाव, शाळा यांचा मेळ परस्परांशी घालण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी गावतरुणांची क्रिकेट, व्हॉलिबॉल, खो-खो टीम गावाशेजारच्या जत्रेमध्ये जमवली, त्या संघाकडून खेळणे, टीम जिंकण्यासाठी निकराची लढाई करणे अशा गोष्टी गावच्या मुला-तरुणांमध्ये सुरू केल्या...