1 POSTS
नरेंद्र पाठक यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, संशोधन,आणि प्रयोगशील शिक्षक म्हणून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2016 मध्ये मिळाला. ते साहित्य अकादमीचे सदस्य आहेत. ते चैत्रेय वासंतिक अंकाचे बावीस वर्षे संपादन-प्रकाशन करत आहेत. त्यांचे 'अनुभवाचिया वाटा' हे पुस्तक साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी सातत्याने लेखन केले आहे. ते वर्धा व अमळनेर येथे झालेल्या साहित्य संमेलनांचे समन्वयक होते. त्यांना ठाणे महानगरपालिकेने 'ठाणे वैभव' आणि 'ठाणे भूषण' या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.