1 POSTS
नारायण कौतिकराव भुजंग हे जालन्याचे चाळीस वर्षांचे शिक्षक. ते एम ए, बी एड शिकलेले आहेत. ते शेतकरी कुटुंबातून शिकून शिक्षक झाले. त्यांची नोकरी जालन्याच्या लोकमान्य विद्यालयात आहे. ते इंग्रजी विषय शिकवतात. त्यांनी विवेकानंदांच्या विचारांनी भारावून जाऊन किन्होळा या गावी स्वामी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. त्यांचा त्यांची पत्नी व दोन मुले असा संसार जालना शहरात आहे.