1 POSTS
नंदन पाटील हे विरार येथील ज्येष्ठ लेखक आहेत. ते अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर शाळेचे निवृत्त शिक्षक आहेत. त्यांनी शिक्षण, सहकार, सामाजिक, राजकीय व साहित्य क्षेत्रात विविध सन्माननीय पदे भूषवली. ते विरारच्या सोमवंशी क्षत्रिय समाज मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, तसेच जीवदानी देवी ट्रस्टमध्ये विश्वस्त व अध्यक्ष होते. त्यांची ‘नन्नाचा पत्रपाढा’, ‘हिरवे स्वप्न’ अशी पंधरा पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचे विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून लेखन प्रकाशित झाले आहे. ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हा मंडळाचे अध्यक्ष होते.