Home Authors Posts by मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष

मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष

1 POSTS 0 COMMENTS
मंगेश विठ्ठल राजाध्‍यक्ष हे मराठी भाषेतील समीक्षक व ललितलेखक होते. ते प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि समीक्षक विजया राजाध्यक्ष यांचे ते पती होते. त्यांनी अहमदाबाद येथील इस्माइल युसूफ, कोल्हापुरातील राजाराम तसेच मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजात इंग्रजी विषयाचे अध्यापन केले. पाठ्यपुस्तक मंडळाचे मुख्य संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. राजाध्यक्ष मुंबईतील ’साहित्य सहवास’ या वसाहतीत रहात. वसाहतीच्या नावाचा वापर करून त्यांनी स.ह. वासकर या टोपणनावाने काही लिखाण केले आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या लिखाणाला 'अभिरुची' या मासिकातून सुरूवात केली. त्‍या मासिकात त्‍यांचे ‘निषाद’ या टोपणनावाने प्रसिद्ध झालेले ‘वाद-संवाद’ हे सदर गाजले होते. त्यांचे 'पाच कवी' (१९४६) हे आधुनिक कवींच्या कवितांचे संपादन केलेले पहिले पुस्तक. त्‍या पुस्तकात त्यांनी केशवसुत, बालकवी, विनायक, गोविंदाग्रज, ना. वा. टिळक यांच्या काव्यांचा आढावा घेतला होता. त्‍यांनी खर्डेघाशी, आकाशभाषिके, शालजोडी, अमलान, पंचम, पाक्षिक, शब्दयात्रा, भाषाविवेक अशी अनेक पुस्‍तके लिहिली. त्यांनी कुसुमावती देशपांडे यांच्या सहकार्याने लिहिलेला ‘हिस्टरी ऑफ मराठी लिटरेचर’ हा ग्रंथ अभ्यासकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरला. त्‍यांचे 19 एप्रिल 2010 रोजी वृद्धापकाळाने मुंबईतील साहित्य सहवासमध्ये निधन झाले.

पूर्णतावादी चतुरस्र व्यासंगी द. ग. गोडसे

दत्तात्रय गणेश गोडसे किंवा द. ग. गोडसे म्हटले तरी ज्यांना त्यांची अपुरी, चुकतमाकत ओळख पटेल, त्यांना चित्रकार गोडसे म्हटले तरी पुरी, पक्की ओळख पटल्यासारखे...