मुकुंद धाराशिवकर
वराहमिहीर: भूगर्भजलाचा पहिला अभ्यासक (Varahmihir – Groundwater Scientist of India’s history)
वराहमिहीर (सन 487 ते 550) हा विचारवंत, पर्यावरणतज्ज्ञ व निष्णात ज्योतिषी उज्जैनच्या (मध्यप्रदेश) परिसरात होऊन गेला. त्याचा ‘बृहत्संहिता’ हा अतिप्रसिद्ध असलेला ग्रंथ. त्यातील गर्भलक्षणाध्याय, गर्भधारणाध्याय, प्रवर्षणाध्याय आणि दकर्गलाध्याय असे चार अध्याय ‘पाणी’ ह्या विषयासंबंधी विस्तृत माहिती देतात.