मुकुंद भागवत हे कर्जतला राहतात. ते अडुसष्ट वर्षांचे आहेत. त्यांनी दीड वर्षांपूर्वी ‘उल्हास नदी स्वच्छता अभियान’ सुरू केले. त्यांच्या परिवारात ते आणि पत्नी रचना आहेत. त्यांना लेखनाची आवड आहे.9834459519
व्यवसाय निवृत्ती घेतली आणि मन विदीर्ण झाले. सगळ्यांची जी अवस्था तशा परिस्थितीत होते तशीच ती मलाही वाटली. मन गुंतले पाहिजे - त्यासाठी काहीतरी असे काम करावे, की जे माझ्या जीवनाचे ध्येय असेल असेही वाटले.