1 POSTS
मधुकर श्रीधर उर्फ म.श्री. दीक्षित हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, इतिहास लेखक व संपादक होते. त्यांना पुण्याचा चालता बोलता इतिहास असे म्हणत असत. दीक्षित यांनी विविध वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून विविध प्रकारचे प्रासंगिक, ऐतिहासिक व चरित्रात्मक लेखन केले. त्यात अहिल्याबाई, जिजाबाई, तात्या टोपे, नेपोलियन, बाजीराव आदींची चरित्रे आहेत. त्यांनी अनेक स्मरणिकांचे संपादन, शंभरावर पुस्तक परीक्षणे लिहिली आहेत.