मोहन शिरसाट हे वाशिम जिल्ह्यातील 'राणी लक्ष्मीबाई कन्या शाळे'त शिक्षक म्हणून कार्यरत अाहे. त्यांची ओळख कवी अाणि लेखक अशी! त्यांनी दैनिक 'लोकसत्ता'मध्ये १९९७ ते २००२ या काळात पत्रकारिता केली. त्यांना नागपूरच्या विदर्भ साहित्य संघातर्फे 'कवी उ. रा. गिरी काव्य पुरस्कार' २००४ साली मिळाला. त्यांनी 'वाशिम जिल्ह्याचा इतिहास' हा ग्रंथ लिहिला अाहे. त्यांचा 'नाही फिरलो माघारी' हा कवितासंग्रह 'ग्रंथाली'कडून प्रकाशित करण्यात अाला.
लेखकाचा दूरध्वनी
9421051823
अकोला जिल्ह्यातील शिंदखेड वरखेड येथे सतिचा स्तंभ आहे. तो गावातील कोणा श्रीमंत घराण्यातील सौभाग्यवती स्त्री सति गेल्यानंतर कोरवून घेतला गेला असावा असा अंदाज अाहे....