मेघना साने
शिकागोची मराठी शाळा (Marathi School At Chicago)
विद्या जोशी यांनी शिकागो येथील शाळा 2014 साली स्थापन केली. चाळीस विद्यार्थ्यांपासून सुरु झालेली ती शाळा आता दोन बॅचेसमध्ये चालते. त्या शाळा नेपरव्हिल आणि शॉनबर्ग येथे असून 2020मध्ये एकूण एकशेचाळीस विद्यार्थीसंख्येपर्यंत गेली आहे."
अमेरिकेत मराठी भाषाशिक्षण (Marathi Language Learning In US)
अमेरिकेत मराठी शाळा गेली काही दशके चालू आहेत. त्यांचे स्वरूप अनौपचारिक रीत्या भरवलेले वर्ग असे अनेक वर्षे होते. ते आता सुसूत्र संघटित केले जात आहे. त्यासाठी खास अभ्यासक्रम आखला गेला आहे.
अनुपमा उजगरे : लेखन आणि कार्य यांची अनोखी वीण (Literary Activist Anupama Ujgare)
लेखिका अनुपमा उजगरे या मूळच्या अहमदनगरच्या. त्यांची शैक्षणिक प्रगती लग्नानंतर पती निरंजन उजगरे व सासरे हरिश्चन्द्र उजगरे यांच्या प्रोत्साहनामुळे घडून आली. त्यामुळे त्यांना सामाजिक जीवनात गती लाभली आणि त्यांची साहित्यविश्वात प्रतिष्ठा निर्माण झाली.
साहित्यसंशोधक अनंत देशमुख (Anant Deshmukh – Veteran Literary Critic)
ठाण्याचेअनंत देशमुख यांचा साहित्य संशोधन, समीक्षा आणि चरित्रात्मक लेखन या प्रकारांत लेखक-संशोधक-समीक्षक म्हणून नावलौकीक गेल्या दशकभरात वाढला आहे; किंबहुना, देशमुख यांना सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष यांच्यासारख्या नामवंत लेखक-समीक्षकांच्या पिढीनंतर त्या क्षेत्रात अग्रगण्य स्थान लाभले आहे...
उद्योजिकेचे सामाजिक भान – संजीवनी पाटील (Sanjeevani Patil: Her Industry And Social Commitment)
संजीवनी पाटील नावाच्या मराठी महिलेने दुबईमध्ये मसाल्यांचा उद्योग करण्यासाठी ओम पीके (OMPK) ट्रेडिंग कंपनी स्थापन केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही शहरे, तालुके, खेडी यांतील महिलांच्या उद्यमशीलतेला वाव मिळण्याची शक्यता तयार झाली आहे.