मेघना भिडे
वंचिता मुखी धान्याच्या राशी (Food for every soul)
मिळून साऱ्याजणी उभारती धान्याच्या राशी, वंचिता मुखी घास भरवती... हे ब्रीदवाक्य घेऊन ठाण्यातील काही मैत्रिणी एकत्र आल्या आणि घरचे स्वयंपाकघर सांभाळता सांभाळता महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांच्या अन्नपूर्णा बनल्या ! त्यांनी गरजू संस्थांच्या स्वयंपाकघरांची जबाबदारी उचलली. हे शक्य झाले ते ध्येयाने प्रेरित झालेल्या उज्ज्वला बागवाडे या एका गृहिणीने पाहिलेल्या स्वप्नातून... उज्ज्वलाने ‘वुई टुगेदर’ धान्य बँकेचा प्रवास ठाण्यातील आठ मैत्रिणींना बरोबर घेऊन सुरू केला आणि महाराष्ट्रातील सव्वाशे गृहिणी धान्यदानाचे काम तिच्याबरोबर गेली आठ वर्षे अविरतपणे करत आहेत...