मेधा सिधये
गडकरी – नाटककाराची विविधांगी प्रतिभा (Tribute to playwright Ram Ganesh Gadkari)
राम गणेश गडकरी हे नाटककार म्हणून त्यांच्या अलौकिक प्रज्ञेने, प्रतिभाविलासाने, भाषावैभवाने मराठी साहित्यसंस्कृती जगतात वेगळे उठून दिसतात. मराठी नाट्यपंचायतन असे किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, खाडिलकर व गडकरी या पाच जणांना म्हटले जाते...