1 POSTS
महेश म्हात्रे हे तरुण, अभ्यासू पत्रकार आहेत. ते ‘महाराष्ट्र रिसर्च सेंटर’चे संपादक-संचालक आहेत. त्यांनी प्रिंट, टीव्ही व इलेक्ट्रॉनिक अशा तिन्ही मीडियांत महत्त्वाच्या जागांवर काम केले आहे. त्यांनी मराठी, इंग्रजी व हिंदी अशा तिन्ही भाषांतील वृत्तपत्रांत व अन्य मीडीयांत संपादकपद भूषवले आहे. महेश यांनी वेगवेगळ्या शिष्टमंडळांच्या माध्यमांतून अनेक देशांचे दौरे केले आहेत. ते ‘टेड टॉक्स’ या इंग्रजीतील गाजलेल्या भाषण मालिकेत अवतरलेले एकमेव मराठी भाषक संपादक आहेत. त्यांचा मनमोगरा हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला आहे.