1 POSTS
माधुरी विलास दाणी फलटण येथे राहतात. त्यांचे एम ए, नेट, पीएच डी असे शिक्षण झाले आहे. त्या फलटणच्या मुधोजी महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यांची ‘मराठी व्याकरण : सुलभ आणि सोपे’, ‘उपयोजित मराठी: सुलभ आणि सोपे’, ‘ओवी आईची’, ‘शब्द संपदा’ अशी पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. त्या फलटणच्या ‘ओंकार वृद्धाश्रमा’त उपाध्यक्ष, तर ‘जन कल्याण समिती’च्या ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’च्या सदस्य आहेत.