1 POSTS
मधुकर ढवळीकर हे पुण्याच्या डेक्कन कॉलेज या संस्थेत पुरातत्त्वशास्त्राचे अध्यापक नंतर विभागप्रमुख आणि संस्थेचे संचालक होते. पुरातत्त्वशास्त्राच्या अध्यापनात प्रत्यक्ष संशोधनाला महत्त्व असते. त्यांनी ठिकठिकाणी जाऊन उत्खनन केले. त्यांनी ‘आर्याच्या शोधात’, ‘नाणकशास्त्र’, ‘पर्यावरण आणि संस्कृती’, ‘पुरातत्त्व विद्या’, ‘भारताची अभ्यासपूर्ण कुळकथा’ यांसारख्या मराठी ग्रंथांबरोबरच इंग्रजीतूनही लेखन केले. त्यांना भारत सरकारचा पद्मश्री, पंतप्रधानांचे सुवर्णपदक यांसारखे सन्मान प्राप्त झाले होते. त्यांचे देहावसन 27 मार्च 2018 ला झाले.