Home Authors Posts by माधव शेटये

माधव शेटये

1 POSTS 0 COMMENTS
माधव शेटये हे ग्रामीण उद्योग आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रातील तज्ञ आहेत. ते शासनाच्या रोजगार हमी समितीचे दापोली तालुका अध्यक्ष होते. त्यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास केला आहे. तसेच, बँकिंग, को-ऑपरेटिव्ह व टुरिझमचे प्रशिक्षण घेतले आहे. ते दापोली अर्बन बँकेचे संचालक आहेत. ते बँकेच्या वतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणांत वेळोवेळी सहभागी झाले आहेत.

सामाजिक दायित्व जपणारी दापोली अर्बन बँक (Dapoli Bank – An institute that belongs to...

दापोली अर्बन सहकारी बँकेची स्थापना 29 फेबुवारी 1960 रोजी झाली. बँक स्थापनेमागे उद्देश दापोली शहराच्या व्यापाराची व सर्वसामान्य माणसाची आर्थिक गरज भागवावी आणि शहराचा विकास साधावा हा होता. दापोली तालुक्याेत कोकण कृषी विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, सायन्स-आर्टस्‌ कॉलेज अशा विविध शैक्षणिक सुविधा बनत गेल्या. मात्र तरी दापोलीच्या तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुणे-मुंबई यांसारख्या शहरांकडे जावे लागे. ती उणीव बँकेने हेरली व सदतीस लाख रुपये एवढी देणगी देऊन दापोली अर्बन सिनिअर सायन्स कॉलेजची स्थापना केली !