1 POSTS
सुरेश लोटलीकर हे हौशी व्यंगचित्रकार आहेत. त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे वर्तमानपत्रांतून व मासिकांतून गेली पंचवीस-तीस वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांतील राजकीय व सामाजिक भाष्य मार्मिक असते. लोटलीकर हे उत्तम ‘कॅरिकेचरिस्ट’ ही आहेत. त्यांनी पुलं व गांधी यांची रेखाटलेली कॅरिकेचर्स खूप प्रसिद्धी पावली. त्यांना पुस्तकातही स्थान मिळाले. त्यांनी जागतिक व्यंगचित्रकलेचे संदर्भ देत महाराष्ट्रातील त्या कलेचे सामर्थ्य व तिच्या मर्यादा सांगणारे सदर लेखन साप्ताहिक सकाळमध्ये वर्षभर केले.