लीना शरद देशमुख या कल्याणजवळील म्हारळ गावी राहतात. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली असून त्या पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्या ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून लेखन करतात. त्यांना लेखनाची व वाचनाची आवड आहे.
कल्याणचे अविरत शेटे हे विद्यार्थ्यांचे लाडके ‘अवि सर’ आहेत. ते त्यांच्या जिवाची धन्यता युवापिढी व विद्यार्थी यांना प्रेरणा देण्यात मानतात. ते साहसी आहेत आणि आव्हाने स्वीकारण्यास नावाप्रमाणेच सतत तयार असतात.