Home Authors Posts by कुमार रामगोंडा पाटील

कुमार रामगोंडा पाटील

1 POSTS 0 COMMENTS
डॉ. कुमार रामगोंडा पाटील यांचा जन्म 5 जून 1985 चा. ते डॉक्टर (बी ए एम एस) आहेत. त्यांचे शिरढोण येथे 'श्री पाटील क्लिनिक' आहे. 'संवाद' व 'सुसंवाद' हे दोन निबंधसंग्रह आहेत. तसेच, 'रंग माझा वेगळा' हा कवितासंग्रह प्रकाशित आहे. लेखकाचा दूरध्वनी 9595716193

प्रत्ययकारी ग्रामीण कादंबरी – विहीर

राजेंद्र जगन्नाथ ठोंबरे यांनी ‘विहीर’ ही कादंबरी लिहिली आहे. ते येलूरसारख्या ग्रामीण भागात राहतात. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. ते पेठ नाका येथील बॉम्बे रेयॉन कंपनीत ‘विव्हर’ म्हणून काम करतात. कादंबरी आहे छोटेखानी, परंतु तिचा सामाजिक आशय मोठा आहे. गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन, घोडा-गाढवांवर संसार बांधून डोंगररांगांमधून फिरणार्‍या एका कुटुंबाला जेव्हा कडक उन्हाळ्यात एका माळरानामध्ये तीव्र तहान लागते, तेव्हा सगळे कुटुंबीय पाण्याच्या शोधार्थ धावपळ करू लागतात. ते हतबल होऊन असहाय्य अवस्थेत असतात, त्याच वेळी ‘संभा’ नावाच्या मुलाला ‘पाण्याचा झरा’ दिसतो! त्याची गाय तेथे पाणी पीत असते. तो पाण्याचा ‘उमाळा’ सर्वांची तहान भागवतो आणि पुढे, त्याच ‘उमाळ्या’चे डबके व डबक्यातून ‘साधी विहीर’ व पुढे नक्षीदार दगडी बांधकाम केलेली ‘विहीर’... हे बदल कसे होत जातात त्याचे वर्णन लेखक राजेंद्र जगन्नाथ ठोंबरे यांनी केलेले आहे. ते प्रत्ययकारी उतरले आहे...