Home Authors Posts by क्षमा खोब्रागडे

क्षमा खोब्रागडे

1 POSTS 0 COMMENTS
क्षमा खोब्रागडे या सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात उपप्राचार्य आणि पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख आहेत. त्यांनी एकशेसहा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे; शोधनिबंधांचे वाचन केले आहे. त्यासाठी त्यांनी चीन, श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, कॅनडा या देशांचा प्रवास केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पीएच डी व एक एम फील अशा सात विद्यार्थ्यांनी संशोधन केले आहे. त्या लोणार सरोवराच्या जलगुणवत्तेचा अभ्यास गेल्या दोन दशकांपासून करत आहेत. त्यांनी लोणारसंबंधी मांडणी आंतरराष्ट्रीय सरोवरीय पर्यावरण समितीच्या (International Lake Environment Committee, Japan) व्यासपीठावर सातत्याने केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील गोदावरी नदीत आढळणाऱ्या प्राणी प्लवकांच्या डीएनए बारकोडिंगबाबत संशोधन केले आहे. औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापन, जैव वैद्यकीय कचरा, औद्योगिकीकरणामुळे जलस्रोतांवरील दुष्परिणाम, जायकवाडी नाथसागर सरोवराचे पाणथळ क्षेत्र या विषयांतील त्यांचा अभ्यास प्रसिद्ध आहे. त्यांनी इंडियन असोसिएशन ऑफ अॅक्वाटिक बायोलॉजिस्टस, भारतीय जलसंस्कृती मंडळ, जलदूत, निसर्ग मित्र मंडळ, अंनिस (महाराष्ट्र) या संघटनांकरताही काम केले आहे. 9822294639

सरोवर संवर्धिनी : गावोगावचे तलाव वाचवण्यासाठी ! (India’s Lake Culture)

'सरोवर संवर्धिनी' हा नवा, अजून फारसा न रुळलेला उपक्रम आहे. त्याचे स्वरूप ठिकठिकाणच्या लोकांनी त्या-त्या ठिकाणी एकत्र येऊन, तेथील जलस्रोतांची काळजी घेऊन जलसंवर्धनाच्या दृष्टीने आखलेला कृती आराखडा असे आहे...