2 POSTS
किशोर ज्ञानेश्वर कुलकर्णी हे जळगावचे रहिवासी आहेत. ते जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. कंपनीमध्ये प्रसिद्धी विभागात गेली सतरा वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी आजवर पत्रकार, लेखक, उपसंपादक या सारख्या विविध भूमिकांमध्ये काम केले आहे. आतापर्यंतच्या केलेल्या कार्यात त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. कुलकर्णी हे नेहमीच सुंदर हस्ताक्षरासाठी आग्रही राहिले आहेत. त्यांचे वैविध्यपूर्ण उपक्रमांतून केलेले हस्ताक्षर क्षेत्रातील कार्य विशेष कौतुकाचे आहे. त्यांची अर्धशतकी लग्नगाठ, घडवा सुंदर हस्ताक्षर, ब्लॉगवाल्या आजीबाई, ज्ञानवाणी, पासवर्ड सुंदर अक्षराचा ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
94227 76759