2 POSTS
काशीनाथ विनायक बऱ्हाटे हे अचलपूर कँपमधील छगनलाल मूलजीभाई कढी कला महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहतात. त्यांचा एकूण आदिवासी लोकजीवन व त्यांच्या भाषा हा आस्थेचा विषय आहे. तत्संबंधात त्यांनी छोटेमोठे सहा प्रकल्प पुरे केले आहेत. त्यांनी कोरकू बोलीचा विशेष अभ्यास करून पीएच डी प्राप्त केली आहे. त्यांची स्वत:ची सहा पुस्तके व आणखी काही संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत. ते राज्य व राष्ट्र पातळींवरील चाळीस परिचर्चांत निबंध वाचून वा उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. ते सरकारच्या व विद्यापीठाच्या विविध समित्यावर आहेतच; त्याखेरीज, ते साहित्यसंघ, प्राध्यापक परिषद, राष्ट्रसेवा दल यांसारख्या स्वायत्त संस्थांमध्ये स्वयंस्फूर्त कार्य करत असतात.