1 POSTS
कार्तिकी विजयकुमार नांगरे या अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी एम ए, बी एड, पी एचडी (मराठी) असे शिक्षण घेतले आहे. त्यांना '1980 नंतरची ग्रामीण कविता' या विषयावर पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांच्या कविता कवितारती, व्यासपीठ, सत्याग्रही विचारधारा यांसारख्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रशांत मोरे यांनी संपादित केलेल्या 'माय अर्थात आईच्या कविता' या प्रातिनिधिक कवितासंग्रहात 'वाट पाहते माऊली' या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.