1 POSTS
जयराज साळगावकर हे लेखक आणि उद्योजक आहेत. ते ‘कालनिर्णय’ या दिनदर्शिकेचे सहसंस्थापक, संपादक, प्रकाशक व कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी वाहतुकीदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी OREN ह्या ध्वनिमापन यंत्राच्या पेटंटसाठी अर्ज केला. ते अर्थ विषयाचे जाणकार अभ्यासक मानले जातात. त्यांचे तसे बरेच लेखन प्रसिद्ध आहे. त्याखेरीज त्यांची अजिंक्य योद्धा बाजीराव, सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास, कर्झनकाळ, नवा गुटेनबर्ग अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना आणि त्यांच्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी गिर्यारोहणाचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करून हिमालयावर दोन मोहिमा केल्या.