1 POSTS
जयंत टिळक हे पनवेलला राहतात आणि संपादन व मुद्रण क्षेत्रात उत्तम कामे करतात. त्यांनी मुद्रणविद्येची पदविका घेऊन तो व्यवसाय केला, पण ते रमले साहित्य-संस्कृती क्षेत्रात. त्यांनी मुद्रण परिषदेच्या ‘मुद्रा’ या नियतकालिकाचे व स्वतःच्या ‘त्रिकाल’ दिवाळी अंकाचे संपादन केले. चित्रपटगीते हे त्यांचे वेड. ते स्वतः गातात, ‘मेलडी एक्सप्रेस’ या नावाने चित्रपट गाण्यांचे कार्यक्रम करतात. त्याखेरीज ‘पनवेल कल्चरल सेंटर’चे ते एक संस्थापक व कार्यकर्ते आहेत.