4 POSTS
जयंत विठ्ठल कुळकर्णी हे न्यूयॉर्क येथे राहतात. ते कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम करत होते. त्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर टॉवर पडण्यापूर्वी आणि नंतरचे चित्रण दाखवणारी फिल्म केली आहे. त्यांना जुन्या गाण्यांच्या कॅसेट्स आणि छायाचित्रे जमवण्याचा छंद आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याही गाण्याचा संदर्भ मिळू शकतो अशी त्यांची ख्याती आहे. ते मुंबईत असताना त्यांच्याकडे सी. रामचंद्र वगैरे मंडळींच्या मैफली होत. त्यांचे ‘शिवाजी पार्क ते सेंट्रल पार्क’ हे आत्मकथन प्रकाशित झाले आहे.