1 POSTS
सुदेश हिंगलासपूरकर हे 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'चे संचालक. ते वयाच्या सोळाव्या वर्षापासून 'ग्रंथाली' वाचक चळवळीशी जोडले गेले. त्यांनी दिनकर गांगल यांच्यानंतर 'ग्रंथाली' वाचक चळवळीचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळले. सध्या ते संस्थेचे विश्वस्त म्हणून कार्यरत अाहेत. त्यांनी 'ग्रंथाली'ची पुस्तके, शब्द रुची हे मासिक किंवा इतर कार्यक्रम कल्पकतेने घडवले. लोकसंग्रह हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष अाहे.
हिंगलासपूरकर यांनी महाराष्ट्र अाणि महाराष्ट्राबाहेर दोन हजारांहून अधिक पुस्तक प्रदर्शने भरवली अाहेत. ते चंद्रपूर येथे १९७८ साली अायोजित केलेल्या साहित्य संमेलनापासून अाजपर्यंतच्या सर्व साहित्य संमेलनात सहभागी राहिले अाहेत. त्यांनी 'ग्रंथाली'च्या माध्यमातून महाराष्ट्रात शंभराहून अधिक ग्रंथयात्रा काढल्या अाहेत. त्यांनी दिनकर गांगल यांच्या सत्तरीनिमित्त 'गांगल ७०, ग्रंथाली ३५' या पुस्तकाचे संपादन व निर्मिती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली 'ग्रंथाली'ने भारतातील अाणि भारताबाहेरील लेखकांची शेकडो पुस्तके प्रकाशित केली. हिंगलासपूरकर यांना उत्कृष्ट कल्पनेचा 'म.टा. सन्मान' पुरस्कार (२००६), संत रोहिदास सामाजिक न्याय पुरस्कार (२००८), उत्कृष्ट संपादनासाठीचा 'अाशिर्वाद पुरस्कार' (२०११) इत्यादी सन्मान लाभले अाहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9869398934