Home Authors Posts by हेमंत शेट्ये

हेमंत शेट्ये

2 POSTS 0 COMMENTS
हेमंत शेट्ये हे पंचवीसहून अधिक वर्षे महाविद्यालयीन, विशेष आणि संशोधनपर ग्रंथालय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अर्थशास्त्र, कायदा आणि ग्रंथालय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी सार्वजनिक ग्रंथालय ग्रंथपालन वर्गासाठी वीस वर्षे अध्यापन केले आहे. ते सध्या प्रवीण गांधी विधी महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय आणि विशेष माहिती संचाच्या सहाय्याने विशेष माहितीसेवा पुरवत आहेत. त्यांना बदलत्या सामाजिक संदर्भाना पूरक अशा वाचनाची विशेष आवड आहे. त्यांनी अनेक पुस्तक परिक्षणे आणि ग्रंथालय क्षेत्रातील विषयांवर दोन पुस्तके लिहिली आहेत. त्यांची ग्रंथालय आणि मुक्त संकेत प्रणाली तंत्रज्ञान क्षेत्रात सल्लागार आणि व्याख्याते म्हणून ओळख आहे.98196 21813

कोविड -19 च्या संदर्भाने शरद पवार (Sharad Pawar And Disaster Management)

कोविड-19 च्या प्रभावाने सारी जीवनाची गती मार्च 2020 पासून थांबली आहे. अर्थकारण, समाजकारण, राजकारण, प्रशासन आणि त्यामुळे नागरिकांची जगण्याची गती मंदावली आहे. कोविड-19 ही आपत्ती नैसर्गिक वा अनैसर्गिक असे रूढ अर्थाने सांगता येणार नाही.

शरद पवार आणि महिला धोरण (Sharad Pawar and Womens Policy)

शरद पवार यांचे राजकारण आणि समाजकारण बहुआयामी आहे. त्यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द ही महाराष्ट्र राज्य स्थापनेपासूनची आहे. त्यांतील संगती-विसंगती अनेकांना गोंधळात पाडते, तरी त्यांच्या अनेक भूमिका या त्यांच्या संस्थात्मक कामांमुळे लोकांच्या मनात टिकून राहिल्या आहेत. त्यामध्ये महिला धोरण, फळबागांना प्रोत्साहन, लातूर भूकंपनिमित्ताने आपत्ती निवारण व्यवस्था अशा महत्त्वाच्या बाबी येतात.