व्यंगचित्रकार जयवंत काकडे यांनी तब्बल पंधरा हजारांवर कार्टून्स, रेखाचित्रे आजतागायत काढली आहेत. ते रेषांचे अवलिया म्हणूनच ओळखले जातात. त्यांची कार्टून्स महाराष्ट्रातील व बाहेरील शंभरांहून अधिक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाली आहेत.
नाशिकचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 26-27-28 मार्चला होऊ शकले नाही, परंतु त्याच तारखांना नाशिकहूनच एका आभासी साहित्य संमेलनाची सूत्रे हलवली गेली आणि ते तिन्ही दिवस एक झकास मराठी साहित्य संमेलन घडून आले ! ते योजले होते चंद्रपूरच्या ‘सृजन’ संस्थेने आणि त्याचे सूत्रसंचालन केले होते मृणाल पात्रीकर-धर्माधिकारी यांनी, नाशिकहूनच...
झाडीपट्टी रंगभूमीला एकशेबत्तीस वर्षें पूर्ण झाली आहेत. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांची ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळख आहे. त्या प्रदेशांत हिरव्याकंच झाडीने, जंगलांनी व्याप्त निसर्गाची लयलूट आहे.
गिरीधर काळे हे शिक्षणाने डॉक्टर नाहीत. पण, त्यांना बिबीगाव परिसरातील समाज डॉ. गिरीधर काळे या नावाने ओळखतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वसामान्य आहे, पण ते करत...
विदर्भातील वर्धा नदीचे खोरे हा दगडी कोळसा खनिजाने समृद्ध असा भाग आहे. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूंला कोळसा खाणी आहेत. वर्धा नदीमुळे चंद्रपूर आणि यवतमाळ...
दत्ता तन्नीरवार हे अपघातानेच इतिहासाचे लेखक झाले. त्यांचे शिक्षण फारसे नाही, पण प्रेरणेतून निर्माण झालेली आवड त्यांना लेखनप्रवृत्त करती झाली. त्यांनी एक-दोन नव्हे तर...
भद्रावती हे ठिकाण वर्धा नदीच्या खोऱ्यात वसले आहे. ते तालुक्याचे शहर आहे. ते चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणावरून सव्वीस किलोमीटर अंतरावर येते. त्या ठिकाणाला...
बेलोरा हे वर्धा नदीच्या तीराजवळ वसलेले यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील गाव. कोळसाखाणींमुळे त्या गावाचे पुनर्वसन झाले. मूळ गाव खाणीत बुडाले गेले. ती गोष्ट 1980...