Home Authors Posts by गंगाधर बुवा

गंगाधर बुवा

2 POSTS 0 COMMENTS
डॉ. गंगाधर बुवा हे सावंतवाडीचे राहणारे. ते 1997 सालापासून 'यशवंतराव चव्‍हाण महाराष्‍ट्र मुक्‍त विद्यापीठ' नाशिक, येथे केंद्र संयोजक म्‍हणून कार्यरत आहेत. त्‍यांनी आजपर्यंत भाषा, साहित्‍य, इतिहास, सांस्‍कृतिक संरचना, पर्यावरण, ग्रंथालय चळवळ या विषयांवर विविध नियतकालिकांमधून तीनशेहून अधिक लिहिले आहेत. त्‍यांचे 'सावंतवाडी संस्‍थान', 'राजमाता', 'राजेसाहेब', 'मॉंसाहेब', 'कोकणातील देवदेवस्‍कीची देवस्‍थाने' अशी अनेक पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. त्‍यासोबत त्‍यांनी काही दिवाळी अंक आणि स्‍मरणीका यांचे संपादनही केले आहे. सावंतवाडी तालुक्‍यात सार्वजनिक ग्रंथालय उभारण्‍यात त्‍यांचा सहभाग होता. त्‍यांच्‍या कामाबद्दल त्‍यांना 'आदर्श ग्रंथपाल', अखिल भारतीय मराठी वाङ्मय मंडळाचा 'उत्‍कृष्‍ठ वाङ्मय पुरस्‍कार', 'राजमाता ग्रंथमित्र पुरस्‍कार' अशा अनेक पुरस्‍कारांनी गौरवण्‍यात आले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9422054978 / 02363 273478
carasole

गंजिफा – सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू

गंजिफा हा पत्त्यांच्‍या साह्याने खेळला जाणारा खेळ. सावंतवाडीत त्‍या खेळाची परंपरा तीन शतकांहून जुनी असल्‍याचे आढळते. तो राजेरजवाड्यांच्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणून खेळला जात...

देवीदेवतांपासून भ्रष्टाचार

0
निसर्गाने किंवा देवाने जेव्हा माणूस घडवला तेव्हा एक भलीमोठी मेख मारून ठेवलेली आहे. माणसाव्यतिरिक्त इतर सर्व प्राण्यांना स्वबळावर जगण्यासाठी एक शारीरिक विशेष गुण किंवा अवयव दिला आहे. मात्र निसर्गाने माणसाला असा कोणताच अवयव दिलेला नाही. त्याऐवजी त्‍याला बुद्धिसामर्थ्य दिले आहे. बुद्धिसामर्थ्य देताना बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा देऊन टाकले आहे! आणि इथेच खरी मेख आहे. हे व्यक्तीनिहाय स्वातंत्र्य हेच मानवजातीच्या सबंध वर्तनाचे आणि गैरवर्तणुकीचे कारण ठरले आहे, आणि या गैरवर्तनाचेच दुसरे नाव भ्रष्टाचार असे आहे...