1 POSTS
गणेश मतकरी चित्रपट समिक्षक म्हणून प्रसिद्ध अाहेत. ते पेशाने अार्किटेक्ट. त्यांनी सिनेमाबाबातच्या लेखनास दैनिक 'महानगर'पासून सुरूवात केली. सध्या ते दैनिक 'मुंबई मिरर'मध्ये लेखन करतात. गणेश यांनी दहा वर्षांपूर्वी 'अापला सिनेमास्कोप' हा ब्लॉग सुरु केला. तो मोठ्या प्रमाणात वाचला जातो. गणेश यांनी सिनेमा या विषयावर लिहिलेली 'फिल्ममेकर्स', 'सिनेमॅटिक', 'चौकटीबाहेरचा सिनेमा', 'समाजवाद अाणि हिंदी सिनेमा' ही पुस्तके प्रसिद्ध अाहेत. ते कथालेखक म्हणून नावारुपाला येत अाहे. त्यांचे 'खिडक्या अर्ध्या उघड्या' अाणि 'इन्स्टॉलेशन्स' हे कथासंग्रह प्रसिद्ध अाहेत. त्यांनी रत्नाकर मतकरी यांच्या कथांचे दोन भागांत संपादन केले आहे. गणेश यांच्या 'सिनेमॅटिक' या पुस्तकाला 'सुभाष भेंडे नवोदित लेखक पुरस्कार' तर 'इन्स्टॉलेशन्स' या पुस्तकाला 'लोकमंगल साहित्य पुरस्कार' लाभला अाहे.
लेखकाचा दूरध्वनी
9820243778