फादर हिलरी फर्नांडीस हे कॅथोलिक धर्मगुरू, लेखक, कवी, कीर्तनकार, प्रवचनकार आणि व्याख्याते आहेत. ते वसईच्या ‘जीवन दर्शन प्रबोधन केंद्र’ आणि उत्तन येथील ‘मुक्तिसागर प्रशिक्षण केंद्रा’चे संस्थापक आहेत. त्यांचा सामाजिक कार्यांतही सहभाग असतो.
इतिहासाला मर्यादा आहे. तो माणसाच्या खोल अंतर्मनात शिरू शकत नाही; काव्य मात्र माणसाच्या अंतर्मनाचा वेध घेऊ शकते. म्हणूनच श्रीकृष्णाचे काव्य व बुद्धाचे मिथक माणसाला अंतरी खोलवर झेप घेण्यासाठी समर्थ करू शकते. पाश्चिमात्य लोक जेव्हा तुलसीदास वाचतात तेव्हा ते म्हणतात, की हा इतिहास नव्हे, कल्पित आहे ! बरोबरच आहे ते. तो इतिहास नाहीच आहे. कल्पितच आहे ते. तरीसुद्धा तुलसीदास हा कवी संत लूक याने ख्रिस्ताला जो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यापेक्षा अधिक न्याय श्रीरामाला देतो...