2 POSTS
अनंत देशमुख यांचा साहित्य संशोधन, समीक्षा आणि चरित्रात्मक लेखन या प्रकारांत लेखक-संशोधक-समीक्षक म्हणून नावलौकीक आहे. देशमुख प्राध्यापक म्हणून आणि मराठी विषयाचे विभागप्रमुख म्हणून 31 डिसेंबर 2007 ला एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या (नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ) पदव्युत्तर विभागातून निवृत्त झाले. त्यांनी आयुष्याचा सर्वाधिक काळ विद्यादान व संशोधन यांतच व्यतीत केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वीस विद्यार्थी एम फिल व दहा विद्यार्थी पीएच डी झाले आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.