Home Authors Posts by डॉ. व्ही.एल. एरंडे

डॉ. व्ही.एल. एरंडे

1 POSTS 0 COMMENTS
डॉ.विठ्ठल एरंडे हे महाराष्ट्र महाविद्यालयात (निलंगा, लातूर) प्राचार्य होते. ते राज्यशास्त्र विषय शिकवत. त्यांना शिक्षणक्षेत्रातील चौतीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी ‘ब्रम्हदेशाचा (म्यानमार) लोकशाहीसाठी संघर्ष’ या विषयावर पीएच डी मिळवली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारा पीएच डी व चोवीस एम फील विद्यार्थ्यांनी संशोधन केले आहे.त्यांची मराठी आणि इंग्रजी भाषांत मिळून एकवीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे; शोधनिबंधांचे वाचन केले आहे. त्यांचे लेखन विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध होते. ते राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेच्या (नॅक) पीअर टीमचे सभासद होते.9923369191

विधानपरिषदेची गरजच काय? (Necessity of MLC?)

विधानपरिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तो कोरोनाच्या अनिश्चिततेमुळे सध्या स्थगित झाल्यासारखा वाटतो, परंतु विधीमंडळाचे अधिवेशन भरवण्याची वेळ आली, की प्रश्न राजकारणात उग्र रूप घेईल. दहा सदस्यांचा कार्यकाळ 6 जून रोजी संपुष्टात आलेला आहे.