Home Authors Posts by दिनकर गांगल

दिनकर गांगल

422 POSTS 0 COMMENTS
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.
_Manav_Mukti_1.jpg

मानवमुक्ती

मानवी जीवनात गेल्या हजार वर्षांत प्रगती झाली त्यापेक्षा जास्त गेल्या शंभर वर्षांत घडून आली; गेल्या शंभर वर्षांत जेवढी प्रगती झाली त्यापेक्षा जास्त गेल्या दशकभरात...

अध्यात्म

महात्मा गांधी यांच्या तोंडचे एक वाक्य मला फार मोह घालते. म्हणे, ते ब्रिटिशांना उद्देशून असे म्हणाले होते, की ‘तुम्ही कोण मला स्वातंत्र्य देणारे? मी...
_GONIDA_1.jpg

गोनीदांनाही विकायला काढले काय?

मराठी टीव्ही मालिकांनी मराठी श्रोतृजनांवर, विशेषत: प्रौढ वर्गावर मोहिनी घातली आहे. त्यामुळे मालिकेसाठी आकर्षक, तोंडात बसेल- मनात राहील असे टायटल साँग बनवणे हे गीतलेखकांसाठी...

डॉ. द.बा. देवल – जीवनशैलीचा पाठ

डॉ. द.बा. देवल यांना बाबा किवा फकीर म्हणावे अशी जीवनशैली ते निवृत्तीनंतर जगत आहेत. त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्ताने त्यांचा नागरी सत्कार इंदूरमध्ये काही वर्षांपूर्वी करण्यात आला....
carasole

लोकशाही ‘दीन’!

0
‘लोकशाही दिन’ दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी साजरा होतो. त्यास आता कर्मकांडाचे स्वरूप आले आहे. बहुसंख्य ‘दिन’ संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सद्भावनेने जाहीर होतात, पण पुढे, देशोदेशीच्या...
carasole

शेतीची दुर्गती!

2
मराठा समाजाच्या मोर्च्यांमुळे महाराष्ट्रात खळबळ खूप माजली आहे. त्यासंबंधी चर्चा झडत आहेत. त्यामध्ये एक मुद्दा वारंवार येतो. तो म्हणजे शेतीला आलेली दुर्गती! मराठा समाज महाराष्ट्रात...

पुरस्‍कार वापसीच्‍या पार्श्‍वभूमीवर

सप्रेम नमस्कार, वि. लेखक-कलावंत-वैज्ञानिक मंडळींनी साहित्य अकादमीचे व अन्य सरकार पुरस्कृत पुरस्कार परत केले. त्या संबंधात काही व्यक्तींनी छोटीमोठी निवेदने प्रसिद्धीस दिली. त्यामध्ये एक मुद्दा...

देवेंद्रजी, रस्त्या-रस्त्यावर अराजक आहे!

देवेंद्र फडणवीस, सप्रेम नमस्कार अरुण साधू यांना ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा ‘जनस्थान’ पुरस्कार तुमच्या हस्ते नाशिकला बहाल करण्यात आला, तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष, जवळून बघितले! निखिल वागळे यांच्या...
carasole

समाज आजारी आहे?

मुंबईच्या वाकोला पोलिस स्टेशनात सहाय्यक पोलिस निरीक्षकाने गैरहजेरीची नोंद करण्याच्या मुद्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व स्वत: आत्महत्या केली. अधिकारीदेखील गोळ्यांना बळी पडले... ही...

भाषा धोरण व संस्कृतिधोरण तयार करणे हे सरकारचे काम नव्हे!

महाराष्ट्राचे मराठी भाषाधोरण व संस्कृतिधोरण गेले काही महिने चर्चेत आहे. त्याआधी अनुक्रमे नागनाथ कोतापल्ले व आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांनी सरकारला धोरणाचे शिफारशीवजा...