Home Authors Posts by दिनकर गांगल

दिनकर गांगल

422 POSTS 0 COMMENTS
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.
_RaleganSiddhi_AannaHazare_1.jpg

अण्णांचे स्पिरिट

अण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण गाजले नाही. त्याची फलनिष्पत्तीदेखील अण्णांचे कार्यकर्ते व सरकार यांच्याकडून खूप उत्साहाने व्यक्त झाली नाही, त्याचे एक कारण म्हणजे अण्णांनी...
_KumarKetkar_VinaySahastrabudhedde_3_0.jpg

विनय सहस्रबुद्धे – कुमार केतकर

दोन राज्यसभा सदस्य! कुमार केतकर यांची राज्यसभेवर काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्रातून निवड हा विषय बऱ्याच कुतूहलाचा झाला आहे. त्याचे प्रमुख कारण केतकर यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेबद्दल महाराष्ट्रात...
_AaheSandarbhahin_Tarihi_1.jpg

आहे संदर्भहीन तरीही…

(निमित्त ‘प्रभात चित्रमंडळा’च्या सुवर्ण महोत्सवाचे) ‘प्रभात चित्रमंडळा’च्या कार्यकारिणीची मीटिंग, मंडळाला पन्नास वर्षें होत आहेत म्हणून राजकमल स्टुडिओमधील किरण शांताराम यांच्या ऑफिसात चालू होती. सेक्रेटरी संतोष...
_MuhurtMarathi_Vidyapithacha_1.jpg

मुहूर्त मराठी विद्यापीठाचा – उद्देश संस्कृतिसंवर्धनाचा

जागतिकीकरणाच्या काळात मराठी समाजाच्या वृत्तिप्रवृत्ती, स्वभावविशेष, सवयी, इच्छाआकांक्षा जपल्या तर जाव्यातच; पण त्याबरोबर त्यांना जागतिक चित्रात अढळ व अव्वल स्थान मिळावे ही भावना स्वाभाविक...
_SSS_1.jpg

साहित्य संमेलन आणि सुसंस्कृत समाज

0
लक्ष्मीकांत देशमुख यांनी बडोदा येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कणखर भूमिका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की “सरकारविरूद्ध तसेच झुंडशाहीविरूद्ध लेखक-कलावंताने नमते घेता कामा नये....

आता नजर जळगाव विद्यापीठावर

0
सोलापूर पाठोपाठ जळगावला हे घडणे अपेक्षितच होते. तेथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास बहिणाबार्इंचे नाव द्यावे अशी आग्रही मागणी सुरू झाली आहे. सोलापूरचे वादंग ही अक्षरश:...
_DharmaPatilchi_Shokantika_1.jpg

धर्मा पाटीलची शोकांतिका

1
धर्मा पाटील या शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली, ती सुद्धा मंत्रालयात! मी ती बातमी कळल्यापासून अस्वस्थ आहे. मी सर्व व्यवहार करत आहे, पण बेचैन...
_Moksha_Dnyandevteshi_1.jpg

मोक्ष –ज्ञानदेवतेशी एकतानता!

0
संगणकावर आंतरजाल म्हणजे इंटरनेट अवतरले ते सुमारे वीस वर्षांपूर्वी. मुंबईतील नेहरू सेंटरने त्याच सुमाराला त्या संबंधीचे एक प्रदर्शन भरवले होते. ती सारी दुनिया नवीच...
_Purushottam_Karhade_2.jpg

अध्यात्म आणि धर्म

1
(पुरूषोत्तम क-हाडे यांनी दिनकर गांगल यांच्या ‘अध्यात्म’ लेखावर घेतलेले आक्षेप व गांगल यांनी केलेले त्याचे निराकरण) दिनकर गांगल यांचा अध्यात्म हा लेख वाचला. मी भगवद्गीता...
_JativantKaviManache_AanadSandu_1_0.jpg

जातिवंत रसिक कविमनाचे आनंद सांडू

आनंद सांडू मूळ मुंबई-चेंबूरचे व्यक्तिमत्त्व विविध गुणी आहे. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्याखेरीज, त्यांनी बांधकाम व्यवसायातही मोठी कामगिरी केली आहे. त्यांचे पूर्वज, प्रसिद्ध...