Home Authors Posts by दिनकर गांगल

दिनकर गांगल

422 POSTS 0 COMMENTS
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.
_vyavasthet_Parivartan_1.jpg

व्यवस्थेत परिवर्तन कोणते हवे आहे?

0
कायदा आणि सुव्यवस्था हा शब्दप्रयोग भारतात गेल्या सत्तर वर्षांत लोकमानसात पक्का बसून गेला आहे. लोकशाहीमधील विष्णुसहस्त्र नामावलीसारखी जी यादी आहे त्यात कायदा आणि सुव्यवस्था...
_Maratha_Aandolan_1.jpg

मराठा आंदोलन आणि व्यवस्था परिवर्तन

0
मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले त्यावेळची गोष्ट. एका बाजूला महाराष्ट्रभर विविध ठिकाणी पसरलेल्या आंदोलनाची अवस्था निर्नायकी होती. मुख्य कार्यकर्ते जे माध्यमांतून व्यक्त होत होते ते...
_Chala_Brahananno_EkVha_Kashasathi_1.jpg

जाती जातींतील ब्राह्मण शोधा!

ब्राह्मणांचा संबंध ज्ञानाशी परंपरेने जोडला जातो. नवा जमानाच ज्ञानाचा आहे! त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मणांचे स्थान अनन्य असायला हवे. ते तसे आहे का? या प्रश्नाचे उत्तर...

गुरूमहात्म्य

गुरूचे महत्त्व भारतीय परंपरेत अनन्यसाधारण आहे. गुरू मध्ये ब्रह्मा-विष्णू-महेश हे तिघेही सामावले आहेत. आणि ही त्रिमूर्ती म्हणजे भारतीय जीवनाचा आधारच होय. त्यांच्यामधूनच सृष्टीची उत्पत्ती...

संस्कार आणि हक्क

शिक्षण आणि संस्कार या गोष्टी भारतीय जीवनात एकमेकांना जोडूनच येतात. शिकायचे म्हणजे संस्कार करून घ्यायचे! तो विचार, मला वाटते, ऋषींच्या आश्रमशाळा, गुरुकुल शिक्षणपद्धत या...

मानवी विकार व संस्कृती

काय योगायोग, पाहा! विजय तेंडुलकर यांचा दहावा स्मृतिदिन आणि जागतिक हिंसाचारविरोधी दिवस हे जवळजवळ लागून, एकापाठोपाठ एक आले. त्यामुळे त्या घटनांना औचित्य लाभले. ही...
_VindaDa_DidDa_1.jpg

विंदा – दा ऽ दीड दा ऽ (Vinda Karandikar)

विंदा करंदीकर हे मराठी साहित्यातील, विशेषत: कवितेतील एक कोडे. ते अवघड जाणवे. त्यांच्या वर्तनविषयक कथा विचित्र वाटत. ते सरळ साधेपणाने समाजात वावरत,  पण सर्वसामान्य...
_Befat_Balya_Vasat_Limaye_1.jpg

बेफाट बाळ्या : वसंत वसंत लिमयेची हिमयात्रा

वसंत वसंत लिमये हा बेफाट ‘बाळ्या’ आहे! त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना केव्हा कशी उद्भवेल ते सांगता येत नाही. तो आयआयटीतून बीटेक झाला. त्याने त्याच्या...

मराठी भाषा आणि बदलत गेलेली मराठी संस्कृती

बदलत्या जगात मराठीचा, किंबहुना कोणत्याही स्थानिक भाषेचा विचार अगदी वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे. भाषा हे संस्कृतीचे मुख्य वाहन असते असा समज पूर्वापार आहे....
_Vasant_Narhar_Phene_1.jpg

वसंत नरहर फेणे – सेलिब्रेशन ऑफ हिज लाइफ! (Vasant Narhar Fene – Celibration of...

वसंत नरहर फेणे यांचा मृत्यू 6 मार्च 2018 रोजी, एक दिवसाच्या आजाराने झाला. फेणे एक्याण्णव वर्षांचे होते. ते त्या दिवसभरात सतरा तास ‘आयसीयु’त जरी...