Home Authors Posts by दिनकर गांगल

दिनकर गांगल

422 POSTS 0 COMMENTS
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

काळा पाडवा (Kala Padwa)

लॉकडाऊन काळातील धावत्या नोंदी लॉकडाऊनमुळे प्रत्येक व्यक्ती 'हाऊस अरेस्ट'मध्ये आहे. नैराश्य, हतबलता तर सर्वांनाच जाणवत आहे पण तरी आपल्या जगातल्या धीराच्या गोष्टी बऱ्याच चालू आहेत. त्या नोंदण्याचा हा धावता प्रयत्न. असेच काही सांगण्याची इच्छा असेल तर जरूर कळवा.
-bhutkhambachaladha-

भूतखांबचा लोकलढा

0
गोव्याच्या शांत, सुशेगात भूमीत गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात पर्यावरणासाठी एक उग्र आंदोलन घडून आले. त्यात एका सत्याग्रहीचा बळी गेला, परंतु ड्युपाँटसारख्या बलाढ्य अमेरिकन कंपनीला...
nava agenda

नव्या युगासाठी नवा अजेंडा!

माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या असे कोणी विचारले तर कोणाच्याही तोंडी पटकन येईल, की अन्न, वस्त्र आणि निवारा. पण त्यांची तर परिपूर्ती झाली आहे. देशात...
heading

तुळशीबाग – ऐतिहासिक, आधुनिक, स्मार्ट! (Smart Tulshibaug)

पुण्यातील तुळशीबागेला अडीचशे वर्षांचा जागता इतिहास आहे. तुळशीबागेचे स्वरूप एका जुन्या राममंदिराभोवती उभा राहिलेला बाजार असे आहे. पिन टू पियानो... म्हणाल ती संसारोपयोगी वस्तू...

राजकारणग्रस्त!

भारतीय समाज निवडणुकीच्या राजकारणाने ग्रस्त आहे. एरवीसुद्धा, मराठी माणसाच्या दोन पसंती सांगितल्या जातात; त्या म्हणजे नाटक आणि राजकारण. सिनेमा गेल्या शतकात आला तेव्हा...
_Aruna_Dhere_1_0.jpg

अरुणा ढेरे यांचे चुकले काय?

2
झकास जमत आलेले साहित्य संमेलन अभिजात परंपरेत पार पडणार असे वाटत असताना शेवटच्या आठवड्यात बिनसले. राज ठाकरे यांच्या नकळत त्यांच्या चेल्याने ठिणगी टाकली आणि...
_chitrakalet_maharashtra_1.jpg

सुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता!

सुहास बहुळकर हा मोठा व्यक्तिचित्रकार (पोर्ट्रेट पेंटर) आहे; त्याने मोठमोठाले कलाप्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेले आहेत वगैरे ऐकून होतो, पण त्याच्याबद्दल ओढ निर्माण...
_Social_Media_2.jpg

सोशल मीडिया म्हणजे गावगप्पा!

0
सोशल मीडिया गेल्या दहा वर्षांत जगभर फैलावला. काही लोकांना तो रोगासमान वाटतो, म्हणून त्यावरील मेसेज खूप झपाट्याने पसरला तर त्याला ‘व्हायरल’ झाला असेच म्हटले...
_Gavgatha_1.jpg

गावगाथा स्पर्धेचा निकाल

1
महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची माहिती ललित, परंतु वस्तुनिष्ठ स्वरूपात संकलित करावी या उद्देशाने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने ‘गावगाथा’ स्पर्धा जाहीर केली होती. तिला वाचकांनी उत्स्फूर्त...
_shyam_khare_1.jpg

इंदूरचे श्याम खरे

0
इंदूरचे श्याम खरे पंच्याऐंशी वर्षांचे आहेत. ते व्यवसायाने सिव्हिल इंजिनीयर; त्यांची निष्ठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. पण त्यांचे आयुष्य साठाव्या वर्षांनंतर एकाएकी बदलून गेले....