Home Authors Posts by दिनकर गांगल

दिनकर गांगल

408 POSTS 0 COMMENTS
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

लेखसूची..

0
लेखसूची.. प्रेषक - प्रमोद शेंडे मायबोली - मराठी विषय विविधपैलंचे दर्शन - दै सकाळ विविध लेखक. दि. 23 नोव्हेंबर 2009...

संरक्षित घर

0
माणसाला आपल्या जीव-जुमल्याचे संरक्षण करण्याची फिकीर कोणत्याही काळात असते. आज मुंबई-पुण्यात सुरक्षित गृहसंकुले बांधण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. चहुबाजूंनी कोट असतो. प्रवेशद्वारावर गुरखा असतो....

तुरुंगातले काव्य

0
आचार्य अत्रे यांना अटक 27 जानेवारी 1956 रोजी होऊन त्यांची रवानगी ऑर्थर रोडच्या तुरुंगात करण्यात आली.ऑर्थर रोड तुरुंगातल्या वास्तव्याच्या दुस-या दिवशी नमस्ते श्री महाराष्ट्रा,भारताच्या...

दोन विनोदवीरांची जुगलबंदी!

0
आचार्य अत्र्यांप्रमाणेच शा.दादा कोंडके हे महाष्ट्रातील प्रख्यात विनोदवीर! हजरजबाबीपणात दादांचा हात धरू शकेल असा माणूस शोधून सापडणार नाही. दादांशी गप्पा मारायला जायच म्हणजे ते...

‘मंत्रा’वेगळा आशुतोष गोवारीकर…

0
भारतात काय किंवा जगभरात, कुठेही काय, चित्रपटसृष्टीतले ग्लॅमर बहुधा कलावंतांच्या खात्यावर जमा होते. चित्रपटनिर्मितीचा मुख्य सूत्रधार आणि श्रेय किंवा अपश्रेयांचा धनी हा, खरे तर,...

मतिमंदांची कलासाधना

0
‘विश्वास’चा अर्थ ‘ट्रस्ट’. अरविंद सुळे ह्यांच्या डोक्यात या शब्दाविषयीची जाणीव फार मोठी. ती अशी, की आपण ज्यांना मतिमंद म्हणतो त्या व्यक्ती/ती मुले मुळात हुशार...

लेखसूची…

मराठी नियतकालिकांत विविध विषयांवर लेखन सतत प्रसिद्ध होत असंत. अशा लेखनाची सूची करण्याचा व शक्य तिथं त्या लेखांची लिंक देण्याचा प्रयत्न इथं असणार आहे....

साद वैचारिकता

बाळशास्त्री जांभेकरांपासून बाबासाहेब आंबेडकरापर्यंतचा काळ महाराष्ट्रात प्रबोधन काळ म्हणून मानला जातो. त्यानंतर महाराष्ट्रातील बौद्धिकता लोपली आणि तेथे बुद्धिमांद्य पसरले. त्याचे एक उघड कारण त्या...

ध्येयासक्तदांपत्य – नंदिनी-सुधीर थत्ते

समाजात काही व्यक्ति अशा असतात की त्या विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होतात आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील रहातात. समाज आणि देश अशाच काही...

ध्येयासक्त दांपत्य – नंदिनी-सुधीर थत्ते

समाजात काही व्यक्ती अशा असतात की त्या विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होतात आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहतात. समाज आणि देश अशाच काही...