Home Authors Posts by दिनकर गांगल

दिनकर गांगल

408 POSTS 0 COMMENTS
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

सु-यांचं गाव की सुराचं गाव?

तंत्रज्ञानात्मक, औद्योगिक वाढीला सामोरे जात असताना, महाराष्ट्रातला समाज हा वैचारिक, भावनिक, आध्यात्मिक क्षमतेचाही आहे याची प्रकर्षानं जाणीव व्हायला ‘थिंक महाराष्ट्र डाँट कॉम’ ह्या संकेतस्थळाचा...

नव्या प्रबोधनाचे साक्षीदार (Witness the New Enlightenment)

0
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय गेल्या काही वर्षांत पुन्हा चैतन्यमय झाले; तेथे अनेक उपक्रम होऊ लागले, वाचकांची वर्दळ वाढली. सुधीर बडे यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ नागरिकांनी...

काकासाहेब गाडगीळांची कढी (Kakasaheb Gadgil)

0
आचार्य अत्रे आणि काकासाहेब गाडगीळ यांचे नाते नेमके कसे होते हे सांगणे कठीण आहे. दोघांच्या एकमेकांवर कुरघोड्या चालू असायच्या. दोघे काँग्रेसमध्ये होते. अत्रे पुणे...

होमी भाभा: भविष्यवेधी मार्गदर्शक (Homi Bhabha: A Prophetic Guide)

1
त्यांना चव्वेचाळीस वर्षांपूर्वी, 24 जानेवारीला अपघाती मृत्यू आला! काही व्यक्ती द्रष्टया व भविष्यवेधी असतात, परंतु त्यांना त्यांच्या दूरदृष्टीतील विश्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी लागणारे कोणतेही पाठबळ...

चपखल उपमा!

0
आचार्य अत्रे यांच्या भाषणांत व लेखनात चपखल उपमा असायच्या. समाजवादी पक्ष फाळणीच्या ठरावाच्या वेळी तटस्थ राहिला. त्या तटस्थ भूमिकेची कारणमीमांसा राम मनोहर लोहियांपासून सर्वांनी...

गांधींना आगळीवेगळी आदरांजली

0
महात्मा गांधींचा स्मृतिदिन 30 जानेवारीला असतो. ठाण्याच्या सुरेंद्र चौधरी ह्या पुस्तकवेडया व्यावसायिकाला त्या दिवशी एक वेगळेच पुस्तक मिळाले. त्यांचा व्यवसाय बिल्डिंग सुपरवायझर व इंटिरियर...

यशवंतराव गडाख…

0
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी घडवलेल्या आणि सत्तरीच्या दशकात उभारीने पुढे आलेल्या पिढीतील ग्रामीण राजकीय नेतृत्वाचे एक वेगळेपण आहे. या पिढीने सहकाराची...

चांगल्या चित्रपटांना फिल्म सोसायटी चळवळीचे अधिष्ठान…

0
28 डिसेंबर 1895 रोजी पॅरीसमधील ऑग्युस्टे व लुईस ल्युमिरे बंधूनी एक-एक मिनिट कालावधीच्या काही चित्रफिती प्रदर्शित केल्या. हाच दिवस चित्रपट कलेचा जन्मदिवस म्हणून मानला...

पराभवानंतरच्या चाली-हालचाली

0
नेहरूंनी घटना परिषदेपुढे  27 नोव्हेंबर 1947 रोजी जे भाषण केले, त्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेतल्या प्रतिनिधींना आपला पराभव झाल्यासारखे वाटले. त्यानंतर प्रतिनिधींनी परिषदेचे चिटणीस यांना...

थट्टा अंगाशी आली..

0
थट्टा अंगाशी आली...नव्हे...डोक्यावर बसली ! आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातले आद्य विडंबनकार! 'झेंडूची फुले' हा त्यांच्या विडंबन काव्यांचा संग्रह सर्वपरिचित आहे. अत्र्यांच्या विडंबनाचा फटका ब-याच लोकांना...