Home Authors Posts by दिनकर गांगल

दिनकर गांगल

408 POSTS 0 COMMENTS
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

सासवडपुढे सगळं जग फुक्काट….!

सासवड हे गाव पुण्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून जेजुरीला जाताना, दिव्याचा घाट ओलांडून गेले की आपण सासवडला पोचतो. सासवड गावात पुरंदरे...

अलौकिक क्षण!

एक दिवसीय क्रिकेट सामन्यांत अनेकांनी दीड शतकाच्या पलीकडे मजल मारली. पण गेल्या एकोणचाळीस वर्षांच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात द्विशतकाच्या पायरीला कोणाला शिवता आलेले नाही. सचिनने...

मराठी चित्रपटांचे यश-अळवावरचे पाणी

मराठी संस्कृतीमध्ये मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा अग्रस्थान मिळत आहे. प्रथम दामले-फतेलाल-शांतारामबापू यांनी 1930 – 1940 चे दशक गाजवले आणि काही अभिजात कलाकृती निर्माण केल्या....

समस्या मतिमंदांची नव्हे; पालकांची!

  समस्या मतिमंदांची नव्हे; त्यांच्या पालकांची! 'अपंग' ही संज्ञा अंध, मूकबधिर, बहुविकलांग, मतिमंद इत्यादी सर्वांसाठी  वापरली जाते, पण मतिमंदत्व व अन्य प्रकारचे अपंगत्व यांत खूप फरक...

बांद्रयाचं आकर्षण

बांद्रा स्कूल आँफ आर्टमधला मित्र 'जेजे'त आला.त्याला बांद्रयाचं फार कौतुक. मोठामोठया चित्रकारांची सीस्केप पाहिलेली.समुद्राचं चित्र सगळयात वेगानं काढावं लागतं. ब्रशच्या काही फटका-यांतच ते...

कोटी- कोटी मोलाची !

कोटीबाजपणा हा अत्र्यांच्या वक्तृत्वाचा अविभाज्य भाग आहे. त्यांची ढमढेरे या आडनावाची 'दोन ढ, एक मढे' ही फोड प्रसिध्दच आहे! एका गावात व्याख्यान चालू असताना, अत्र्यांच्या...

अक्षय वाचनाचा वसा

वाचन मंदावत आहे. सार्वजनिक वाचनालयांना ओहटी लागली आहे. त्यांना नवीन सभासद मिळत नाहीत असे सगळे वातावरण असताना डोंबिवलीमध्ये काही खाजगी वाचनालये गेली अनेक वर्षे...

1 मे 1960. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली!

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली. मराठी बोलणा-या तीन कोटी (त्या वेळची लोकसंख्या) जनतेचे महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात आले. तेही मुंबईसह! 'मुंबई,...

हरहुन्नरीपणा …

हरहुन्नरीपणा हा अत्रे खानदानाचाच गुण आचार्य अत्रे यांचा जीवनपट पाहिला तर अरेबियन नाईट्सच्या कथाही ख-या घडल्या असाव्यात असे वाटू लागते. त्यांनी एका क्षेत्रातून दुस-या क्षेत्रात...

एक ‘भेट’ कार्यशाळा…

ललित कलांमधील सौंदर्य व मूलभूत तत्त्वे.... मैत्रेयच्या मित्रांना एकत्र घेऊन, विदुरने त्यांना सतार शिकवायला सुरुवात केली. आमच्या पुण्याच्या कर्वेनगरच्या ‘विरेली’ या घरामध्ये दर बुधवारी विदुरचा...