Home Authors Posts by दिनकर गांगल

दिनकर गांगल

408 POSTS 0 COMMENTS
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

कुंभ मेळा

कुंभमेळा हरिद्वारचा कुंभमेळा 28 एप्रिलला संपला. या कुंभमेळयाची एक-दोन वैशिष्टये होती. उत्तराखंड राज्य झाल्यानंतर प्रथमच बारा वर्षांनी येणारा हा महोत्सव घडून येणार होता. त्या दृष्टीने...

ई-लर्निंगला मिळाला मराठी साज

एखाद्या क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर आपला निवृत्तीचा काळ विश्रांती किंवा इतर कारणांसाठी द्यावा, अशी सर्वसाधारण धारणा असते. मात्र आपण घेतलेले शिक्षण आणि केलेले...

दगडांच्या देशा… राकट देशा…

दगडांच्या देशा... राकट देशा... ही आणि महाराष्ट्राची अशी कैक वर्णनं लहानपणापासून माझ्या कानावर पडत आहेत. पण या वर्णनांमधला माझ्या वाटयाला आलेला महाराष्ट्र जेमतेमच. जेव्हा...

चंगळवादामुळे सामाजिक भानच हरवलंय…

पैशाला प्राप्त झालेले अवाजवी महत्त्व, 'स्व'केंद्रित विचार आणि भौतिक गोष्टींमध्येच सुख मानण्याची मनोवृत्ती या आणि अशा इतर कारणांमुळे महाराष्ट्राला अनेक सामाजिक समस्यांनी घेरले आहे....

…आणि देवांना चेहरा मिळाला!

कै. सौ. वासंती लक्ष्मण काळे ह्या जरी इंग्रजी विषयातील पदवीधर असल्या तरी चित्रकला, पेंटिंग, भरतकाम, विणकाम, हस्तकला ह्या कलांमध्ये पारंगत होत्या. त्यांनी स्वत:च्या हातांनी...

कल्पनेतल्या देवदेवता

भारतीय चित्रकला क्षेत्रावर 1900 ते 1970 पर्यंत ब्रिटिशांचा मोठा प्रभाव आहे. जे.जे.मध्ये जे अध्यापक-प्राध्यापक-संचालक होते, ते इंग्रजी होते. मुळात ब्रिटनमधील कला रेनेसान्स काळाने प्रभावित...

गझल तरुणाईची

चौदा एप्रिल (2010) रोजी बोरिवलीच्या प्रबोधनकार नाटयगृहाच्या 'मिनी थिएटर'मध्ये, विजय गटलेवारांच्या 'गझल तरुणाईची' ह्या मराठी गझल आल्बमचे (ऑडिओ सी.डी.) प्रकाशन चित्रपट निर्मात्या सुषमा शिरोमणींच्या...

‘रक्ताचं नातं’

‘रक्ताचं नातं’ ही अनेकदा अतिशय सहजपणे वापरली जाणारी संज्ञा आहे! त्यामुळे वास्तवात ती मर्यादित; खरंतर संकुचित अर्थाने वापरली जाते. मात्र ‘रक्ताच्या नात्या’ला मोठा अर्थ...

लेकास निरोप

जागतिक पुस्तक दिनानिर्मित्ताने.... शेक्सपीयरचा जन्मदिन – २२ एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन म्हणून मानला जातो. त्या निर्मित्ताने, तळेगावच्या इंग्रजीच्या प्राध्यापक अपर्णा महाजन यांनी शेक्सपीयरच्या एका...

‘स्नेहसेवा’

स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता 'स्नेहसेवा' 'स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता' असं ब्रीदवाक्य असलेली 'स्नेहसेवा' ही संस्था 1981 मध्ये काही ज्येष्ठ मित्रांच्या कौटुंबिक मैत्रीतून सुरू झाली....