Home Authors Posts by दिनकर गांगल

दिनकर गांगल

408 POSTS 0 COMMENTS
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

इंग्रजी भाषा – वाघिणीचे दूध? नव्हे,

इंग्रजी भाषेतच दलितोध्दार आहे असे नक्की करून दिल्लीजवळच्या बांकेगाव येथे इंग्रजी देवीचे देऊळ बांधले आहे आणि त्याला पहिली दोन लाख रुपयांची देणगी पुण्याचे...

‘ग्रामोक्ती’

'ग्रामोक्ती' हा आगळावेगळा सुविचार संग्रह आहे. अंबाजोगाईचे पशुवैद्य डॉ. शिवाजी मधुसुदन पंचादेवी हे नोकरी-व्यवसाय करता करता सातारा जिल्ह्यातील एकसळ या गावी येऊन स्थिरावले. तेथे...

जनगणनेत जातींची नोंद

जातीच्या पुढील अभ्यासातून त्यांची त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये कळून येतील आणि मग कदाचित ध्यानात येईल, की या जातींमुळे मानवी जीवनातील केवढी मोठी विविधता सुरेख...

धवलरिणींची कमतरता

'बाळंतपणाला सुईण आणि लग्नकार्याला धवलरिण' अशी म्हण आहे. मात्र मे महिन्याभरात लग्नांचे अनेक मुहूर्त असल्यामुळे धवलरिणींची कमतरता जाणवू लागली आहे. आगरी-कोळी समाजात धवलरिणींना लग्नकार्यात...

विरोधकांची बाजू

विरोधकांची बाजू त्यांच्यावर त्यांच्याच भाषेत उलटवली! 'नवयुग ' हे साप्ताहिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं, तशी त्यावेळच्या अन्य नियतकालीकांबरोबर, नवयुगलाही दोन हात करावे लागले. या सगळया खेळात...

‘दुर्गा झाली गौरी’: अखंड तीस वर्षे!

'दुर्गा झाली गौरी': अखंड तीस वर्षे! काही निरीक्षणे 'दुर्गा झाली गौरी' हे बालनाट्य पंचवीस वर्षांनी पाहिले. आविष्कार-चंद्रशाला या प्रायोगिक नाटक मंडळींनी 'दुर्गा झाली गौरी' हे नाटक...

कसाबचे स्थानिक साथीदार कोण?

अजमल कसाबला यथाकाल फाशी देतीलही. तो एक उपचार आहे. भारतदेश न्यायाने चालतो हे जगाला कळवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेचा उपचार सुरू करण्यात आला. त्या औपचारिकतेची सांगता...

स्वस्तात हृदय शस्त्रक्रिया

स्वस्तात हृदय शस्त्रक्रिया पश्चिम बंगालमधील बेलूर येथील स्वामी विवेकानंदांचा मठ प्रसिद्ध आहे. त्याच्या जवळच काही अंतरावर एक रुग्णालय आहे. त्यामध्ये हृदयावरील शस्त्रक्रिया केवळ पंचवीस...

श्रम, श्रमपरिहार आणि तुकोबाराय!

आचार्य अत्रे यांच्या विनोदाचे किस्से जसे प्रसिध्द आहेत, तसेच त्यांच्या मद्यपानाचेही! अर्थात अत्रे आणि अन्य मद्यपि यांच्यात फार मोठा फरक आहे, तो म्हणजे अत्र्यांनी...

मराठीला राजभाषा म्हणून स्थान..

महाराष्ट्रात मराठीला राजभाषा म्हणून स्थान.. मराठी भाषेसाठी राज्य सरकारात स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणार असल्याबाबतची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने केली आहे....