Home Authors Posts by दिनकर गांगल

दिनकर गांगल

408 POSTS 0 COMMENTS
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

‘कोमसाप’चा लोकशाही उठाव

'कोमसाप'चा लोकशाही उठाव साहित्य महामंडळ नमणार? - दिनकर गांगल साहित्य आणि नाट्यविश्वात अराजक आहे. कलासिध्दांतांपासून आचरणापर्यंतच्या संकल्पना स्पष्ट व रीतीच्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे अखिल भारतीयपासून स्थानिकपर्यंतच्या संमेलनात...

जागरण

जागरण संकलन : राजेंद्र शिंदे महाराष्ट्राचे खंडोबा हे दैवत आहे. जेजुरीचा खंडोबा हा अठरा पगड जातींचा कुलस्वामी आहे. जागरण हे देवासाठी एक दिवस जागण्याचे...

एफ टी आय आय नावाचे गोत्र

दादासाहेब फाळके यांच्या 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'पेक्षा अधिक सुसज्ज, अधिक तंत्रकुशल अशी प्रभात कंपनी होती. मात्र अवघ्या दहा वर्षांत ही परंपरा खंडित झाली. स्वातंत्र्यापूर्वीच, 'प्रभात'चा अस्त...

बोधी नाट्य परिषदेचा महोत्सव -२०१०

बोधी नाट्यमहोत्सव मुंबईमध्ये अलिकडेच साजरा झाला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी नाटककार शफाअत खान यांनी उद्बोधक भाषण केले. त्याचे शब्दांकन, आदिनाथ हरवंदे यांचा वृत्तांत आणि या महोत्सवाचे...

नाव कळलं तर झाडच गेलं !

नाव कळलं तर झाडच गेलं ! - प्रकाश पेठे वसंत ऋतु सुरू आहे. खूप वर्षांपूर्वी मी वडोद-यातल्या झाडांचा सर्व्हे केला होता. एकशे अठ्ठावीस प्रकारच्या झाडांची छायाचित्रं...

मुस्लिम महिला मंत्री :

मुस्लिम महिला मंत्री : ग्रेट ब्रिटनच्या अलिकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये संमिश्र सरकार निवडून आले आहे. देहिड कॅमेरॉन हे ग्रेट ब्रिटनचे नवे पंतप्रधान आहेत. मंत्रीमंडळात काँझर्वटी पक्ष...

‘प्रबोधना’चा वसा

‘प्रबोधना’चा वसा - श्रीकांत टिळक नागरिकांच्या हक्कांसाठी, त्यांच्या  मागण्यांच्या पूर्ततेसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणा-या संस्था-संघटनांची महाराष्ट्रात वानवा नाही. मात्र नागरिकांना...

माझी मराठी अस्मितेची कल्पना : उदार, सर्वसमावेशक

माझी मराठी अस्मितेची कल्पना:उदार, सर्वसमावेशक - तारा भवाळकर भौगोलिक दृष्टया, महाराष्ट्र हा भारताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला सांधणारा दुवा, सेतू आहे. महाराष्ट्राने प्राचीन काळापासून उत्तर व दक्षिण...

ब्लॉग सहिष्णू आहे म्हणून …

ब्लॉग सहिष्णू आहे म्हणून ... - अवधूत डोंगरे 'इंटरनेट' या शब्दाचे शब्दशः मराठी भाषांतर होते, 'आंतरजाल'. 'वर्ल्ड वाईड वेब'चे शब्दशः मराठी भाषांतर होते, 'जगभर पसरलेले जाळे'....

हम परदेसी लोग!

'हाँ जी' असे विनयाने म्हणणे म्हणजे 'हांजी हांजी करणे' असे नाही. भांडण केल्याने का कधी धंदा होतो? धंद्यात बरकत हवी असेल तर गोड बोलायला...