Home Authors Posts by दिनकर गांगल

दिनकर गांगल

408 POSTS 0 COMMENTS
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

‘लालबाग-परळ’ संस्कृतीचा प्रभाव

लालबागचा राजा गेल्या दोन दशकांत आर्थिक दृष्टया श्रीमंत होत गेला, परंतु त्याचे प्रजाजन देशोधडीला लागले; मात्र ‘गणेश’या विद्याकलेच्या देवतेने तेथील कलागुणांना प्रोत्साहन दिले. तेच...

‘निर्माण’: ‘मी कोण’, ‘मी कशासाठी?’

अभय व राणी बंग यांचा ‘निर्माण’हा युवा पिढीसाठी नवा प्रकल्प. या ‘समुदाया’ने ‘धान्यापासून दारू’ विरूद्धची मोहीम यशस्वी राबवली. ‘निर्माण’ला जूनमध्ये चार वर्षे झाली, त्या...

मेधाचं काय करायचं ?

मेधाचं काय करायचं ? - ज्ञानदा देशपांडे   शिक्षणक्षेत्रात, कॉर्पोरेट जगात, लेखकांच्या संमेलनात, सरकारी कर्मचा-यांच्या समुहात, महाराष्ट्रात-महाराष्ट्राबाहेर, अमेरिकेत, कॉन्फरन्समध्ये किंवा चार इंटुक लोकांबरोबरच्या टॅक्सीच्या...

दैनिक महाराष्ट्र टाइम्स

‘महाराष्ट्र टाईम्स’ ची सुरवात 17 जून 1962 या दिवशी वटपौर्णिमेला झाली आणि मराठी वर्तमानपत्रांचे जग बदलून गेले. प्रथम संपादक द्वा. भ. कर्णिक यांची पाच...

मराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव

मराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव - ज्ञानदा देशपांडे मराठी मन दुखावलेलं आहे. 'माझा न्याय्य हक्क मला न देता तुम्ही मला तंगवताय' असं वाटून ते चिडकंदेखील झालंय...

रेडिओ सिलोन ऐकतो कोण!

रेडिओ सिलोन ऐकतो कोण! - कुमार नवाथे रेडिओ सिलोन पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. सिलोन रेडिओ केंद्राचे संध्याकाळचे प्रसारण गेली दोन वर्षे बंद होते. केवळ सकाळी...

माझे नवजीवन

'स्वत:साठी जगलास तर मेलास व दुस-यांसाठी जगलास तरच जगलास' माझे नवजीवन - विभाकर सुलाखे आता, आयुष्यात मागे वळून बघताना खूपच छान वाटते. सुरुवातीची अडथळ्याची शर्यत कशीबशी...

ओढ इतिहासाची!

ओढ इतिहासाची! - अरूण निगुडकर मी शाळेत असताना मला उपेंद्र गुरुनाथ मण्णूर नावाचे शिक्षक इतिहास विषय शिकवत. त्यांना अलेक्झांडर व इजिप्त यांत खूप रस होता. ते...

‘कोमसाप’चे चेंबूर साहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबुर येथे ५ जून रोजी झाले. त्याचा धावता वृत्तांत आणि संमेलनाच्या अध्यक्ष वसुंधरा पेंडसे –नाईक यांच्या भाषणातील...

सेलिब्रेशनच्या नॉव्हेल आयडिया

सेलिब्रेशनच्या नॉव्हेल आयडिया अपर्णा महाजन तळेगावला 'हार्मनी' नावाच्या घरात राहतात आणि चाकणच्या कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवतात. त्यांच्या घरापासून नऊ किलोमीटर अंतरावर, त्यांनी व त्यांचे पतिराज विदुर...