दिनकर गांगल
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम – निवेदन आणि आवाहनदेखील! (Think Maharashtra – Appeal)
वाचण्याकडे लोकांचा कल कमी होत आहे. ऐकण्या-पाहण्याकडे वाढत आहे. म्हणून आम्ही सोबत लेख आणि त्याचा ऑडियोही देत आहोत. 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' हे वेबपोर्टल महाराष्ट्राचे, मराठी भाषासंस्कृतिचे सामर्थ्य प्रकट करावे; आणि त्याच वेळी, बदललेल्या काळात मराठी व जागतिक यांचा सांधा स्पष्ट व्हावा या हेतूने, दहा वर्षांपूर्वी सुरू केले.
पिंगुळीच्या ठाकर समाजाची लोककला (Pinguli’s Thakar Folk Art)
मोहन रणसिंग याचे जीवन तळचा समाज जागा होत होता त्या काळात घडले; त्यामुळे तो वयात आल्यावर, नोकरीत स्थिरावल्यावर समाजकार्यास लागला. किंबहुना मोहनसारख्या शेकडो कार्यकर्त्यांचा समाजाला जागे करण्यात, समाजाचा विकास करण्यात हातभार लागला आहे. ही गोष्ट चाळीस वर्षांपूर्वीची,
अर्चना आंबेरकरची ग्लोबल भाषा (Archana Amberkar’s Global Language)
भाषाशास्त्राची अभ्यासक अर्चना आंबेरकर दोन-अडीच वर्षांपूर्वी मला भेटली, ती तिला इंटरनेटवरील मराठी भाषेतील 'डेटा' हवा होता म्हणून. आम्ही 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर मराठी भाषा-संस्कृतीबाबत अडीच-तीन हजार लेख संकलित केले आहेत. अजून खूप मोठे काम बाकी आहे.
कोरोना काळातील संयम व शिस्त (Can Corona Benefits Be Maintained?)
रेखा नार्वेकर हे नाव मुंबई-कोकण परिसरात तरी, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सर्वपरिचयाचे आहे. लेखिका-कवयित्री-ज्ञानेश्वरीच्या रसाळ प्रवचनकर्त्या आणि साहित्यिक समारंभातील जिव्हाळ्याचा वावर...सदैव हसतमुख आणि प्रसन्न चेहरा. त्या शिकल्या विज्ञानशाखेत, पण त्यांनी कास धरली साहित्यकलेची. त्यांनी हौसेने कथा, ललित गद्य लिहिले, कविता केल्या. त्यांच्या त्या साहित्याचे संग्रह प्रसिद्ध आहेत...
संदीप – निराधारांचा आधार (Sandip’s Home for Destitutes)
इतिहास-पुराणकथांत वर्णन केलेली माणसे असतात तशी माणसे सभोवताली दिसली, की प्रत्येक वेळी अचंबित व्हायला होते. कुडाळच्या संदीप परबची गोष्ट तशीच आहे. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्याचा गुणसमुच्चय वाढवतच गेलेली आहे. तो शालेय वयात असताना त्याने शेजारच्या बालविधवेची पीडा जाणली. ती माहेरी आलेली होती.
थोरोच्या गावात रजनी देवधर (Rajani Deodhar in Thoreau’s Village)
मी लॉकडाऊन काळातील धावत्या नोंदींमध्ये लिहित असलेल्या काही लेखांबाबत विशेष औत्सुक्य येणाऱ्या प्रतिसादावरून जाणवते. ते प्रल्हाद जाधव याच्या 'थोरो-दुर्गा भागवत भेटी'च्या कल्पनेबाबत तसेच घडले. त्यावर प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या.
अपर्णा-विदुर महाजन यांचा ध्यास (Vidur-Aparna Mahajan: Art Loving Couple)
तळेगावचे विदुर आणि अपर्णा महाजन हे जोडपे प्रेमळ आणि लाघवी आहे. ती दोघे विचाराने आणि वृत्तीने वेगवेगळी व स्वतंत्र आहेत, पण परस्परांना पूरक आहेत. विदुर सतारवादक-अभ्यासक-संशोधक-प्रचारक आणि अपर्णा तळेगाव जवळच्या चाकण येथे कला व वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विषयाची प्राध्यापक व प्रमुख आहे.
थोरो, दुर्गा भागवत आणि प्रल्हाद (Thoreau, Durga Bhagwat And Pralhad Jadhav)
दोनशे वर्षांपूर्वीचा अमेरिकन हेन्री डेव्हिड थोरो, शंभर वर्षांपूर्वीच्या दुर्गा भागवत आणि आजचा प्रल्हाद जाधव यांच्यात नाते काय आहे? थोरो हा जगद्विख्यात विचारवंत व ललित लेखक आहे. त्याने जगभर अनेक थोरामोठ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यामध्ये महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, टॉलस्टॉय इत्यादींचा समावेश होतो. त्याने सविनय कायदेभंगाचे तत्त्व प्रथम मांडले.
शेखरचा शेतजीवनाचा आनंद ( Engineer Seeks Happiness in Farming)
शेखर भागवत मुंबईचा स्ट्रक्चरल इंजिनीयर शेखर भागवत हा हरहुन्नरी, निसर्गप्रेमी आहे. तो आयआयटीत शिकत असताना पक्षीनिरीक्षण, निसर्गात भटकंती यांचे वेड त्याला लागले. त्याने तेव्हाच ठरवले, की वयाच्या पन्नाशीच्या आसपास व्यवसाय-नोकरी सोडून छंद आणि हौशी जोपासत जगायचे.
प्रश्न जीवन मरणाचा की भांडण्याचा? (Domestic Violence)
कोरोनाच्या बरोबरीने जगभर फैलावलेली आपत्ती म्हणजे घरगुती हिंसाचार (डोमेस्टिक व्हॉयलन्स). तो विषय देशोदेशी चिंतेचा बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील त्याबाबत सावधान असण्याची गरज व्यक्त केली आहे. पुण्यामध्ये बायकोला छळणाऱ्या नवऱ्यालाच क्वारंटाईन करण्याची सजा फर्मावली गेली आहे.